Friday, March 23, 2012

गुढी पाडवा..

       

        गुढी पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच मराठी नवीन वर्ष . या दिवशी घरो-घरी गुढी उभारली जाते हे सगळा बरेच वर्ष माहित होता पण काल एक वेगळ्याच प्रकारचं celebration पण होता असं कळ्ला. कॉलेज वरना परत येताना काल बराच उशीर झाला आणि ठाण्याला बघतो तर काय ,आकाशात किती सारे  आकाश कंदिल..दिवाळी तर नाही आहे मग का बरं हे??...मी कधीच नव्हता पहिला असं काही. नंतर मैत्रिणीनी सांगितलं कि ते गुढी पाडव्यासाठी आहे म्हणून .अजून एक गोष्ट कळली ते म्हणजे ठाण्यातील "तलाव पाली" वर सगळे पाण्यात दिवे सोडतात या इच्छेनि  कि नवीन वर्ष खूप आनंदाचे क्षण घेऊन येईल .मला जायचा होता पण काही जमला नाही...असो.

                  
       ठाण्यात येऊन मला फार फार तर एक-दीड वर्ष झालंय पण बर्याच नवीन सांस्कृतिक गोष्टी शिकायला मिळतायत.मुंबईत होते तेव्हा इतका सगळा नवता माहित .खास करून ती शोभा यात्रा.. लेझीम,मोटरसायकल राल्ली ... त्या सुरेख रांगोळ्या..अहाहा!!...या दिवाळीला जायचंच असं ठरवलंय ! आणि माझ्या मैत्रिणी आहेतच मला रोज एक नवीन गोष्ट सांगायला.खरच ठाणे-डोंबिवली मराठी संस्कृती जपण्यात मुंबईहून एक पाउल पुढे आहे हे बोलण्यात काही गैर नाही.
     
      जाता जाता मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हर्धिक सुभेच्छा !!!!!!!

No comments:

Post a Comment

awaitin ur response...