Sunday, March 11, 2012

हरकत नाही....


संदीप खरे......यांच्या काव्यसंग्रहातील ही एक सुंदर आणि  अतिशय सौम्य कविता जी सहज मनाला भिडते....आज सहज त्यांच्या कविता वाचताना ही भेटली...

"अक्षर  छान  आलय यात !" 
माझी कविता  वाचताना 
मान  तिरकी करत 
ती  एवढच म्हणते.... 


डोळ्यात  तुडुंब  भरलेली झोप , 
कपाळावर  पेंगत  बसलेले  काही  भूरते  केस , 
निसटून  गेलेली  एक  चुकार  जांभई , 
आणि नंतर ..... 
वाचता  वाचता  मधेच  
आपसूक  मिटलेले  तुझे  डोळे, 
कलंडलेली  मान, 
आणि  हातातून  अशीच  कधीतरी  निसटलेली, 
जमिनीवर  पडलेली 
माझी  कवितांची  वही... 


हरकत नाही....हरकत  नाही; 
कविता  म्हणजे  आणखी  तरी  काय  असतं !!!!

No comments:

Post a Comment

awaitin ur response...