चालत असतो आयुष्याच्या वाटेवर ...
भेटता कोणी मनासारखा...प्रश्न पडतो "जमेल का रे आपला ?"..
होता असा असंख्यवेळा ..शोधत असतो जेव्हा त्याला ,
तो जो करेल आपल्यावर जिवापार प्रेम..जिंकेल तो आपल्या हृदयाचा गेम..
ठरवून वेगेरे कही नाही...मुळात तर शक्यच नाही..
प्रेम कधी अवतरता आपल्यात...कधीच कळत नाही..
हळूच करू लागतो कोणावरतरी जिवापार प्रेम...स्वतःलाही नसतं माहित..
त्याच्या प्रत्येक गोष्टीची होऊ लागते सवय..
त्याचाहून दूर होण्याचे वाटू लागते भय...
नाही नाही म्हणता म्हणता गुंततो त्याच्यात..
हृदयाच्या एका खोलीत ठेवतो त्याला एका प्रेमळ पिंजर्यात...
पण आपला शोध तर चालूच असतो.."कोण असेल तोः??"
एक गोष्ट मात्र विसरतो..स्वतःच्याच मनाला विचारायला ...
"तुझ्या मनात कोणी आहे का रे ??"
हेच का ते प्रेम...आपसूक प्रश्न पडतो...
मनात दडलेली ती व्यक्ती...तोच खरा शोध...
न कळणार..न समझू देणारं..
स्वतःचाच स्वतःला कळू न देणारं....
असंच एक गोड गुपित सत्य असतं !!!!